Akshata Chhatre
बहुतांश तरुण ठराविक विषयांमध्ये स्पष्ट विचार करतात, पण नातेसंबंधांच्या बाबतीत मात्र त्यांच्या मनात सतत द्विधा अवस्था असते; एकटे राहावे की नाते स्वीकारावे?
एकटे राहणे म्हणजे पूर्णतः स्वतःच्या आयुष्याचा ताबा घेणे. निर्णय स्वातंत्र्य, वेळेचं योग्य नियोजन आणि स्वतःच्या विकासासाठी लागणारा वेळ हे याचे मुख्य फायदे.
स्वातंत्र्यासोबत येते ती एक विशिष्ट एकाकी भावना. जेव्हा मानसिक ताणवाढतो तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणीतरी हवं असतं. आर्थिक व भावनिक जबाबदाऱ्या एकट्याने पेलाव्या लागतात.
एक सच्चा जोडीदार मिळाल्यास तो तुमचा आधार बनतो. सुखदुःखात साथ देतो, जबाबदाऱ्या वाटून घेतो, आणि जीवनाच्या प्रवासात तुमच्यासोबत निश्चिंतपणे उभा राहतो.
नातं केवळ दोन व्यक्तींमधील नसतं, तर दोन कुटुंबांमधीलही असतं. त्यामुळे जबाबदाऱ्यांचं ओझं वाढतं. नातं टिकवण्यासाठी प्रत्येक क्षणाला समजून घेणं आवश्यक आहे.
योग्य वेळ, योग्य माणूस आणि मानसिक स्थैर्य या गोष्टी लक्षात घेऊन निर्णय घ्या कारण शेवटी तुमचं समाधान महत्त्वाचं आहे.