Sameer Amunekar
टाळूवरील अतिरिक्त तेल, Malassezia नावाची यीस्ट, कोरडी त्वचा किंवा योग्य स्वच्छता न राखल्यामुळे कोंड्याची समस्या उद्भवू शकते.
हलका कोरडेपणा असल्यास थोड्या प्रमाणात तेल उपयुक्त ठरू शकते. मात्र फंगल कोंडा असल्यास जास्त तेल लावल्याने समस्या वाढू शकते.
रात्रभर भरपूर तेल ठेवणे, टाळूवर घाण आणि घाम साचणे यामुळे कोंडा आणि खाज वाढण्याची शक्यता असते.
थोड्या प्रमाणात कोमट तेलाने हलका मसाज करा आणि 30-60 मिनिटांनंतर सौम्य किंवा अँटी-डँड्रफ शॅम्पूने केस धुवा.
केटोकोनाझोल, झिंक पायरीथिओन किंवा सेलेनियम सल्फाइडसारखे घटक असलेले शॅम्पू कोंडा नियंत्रित करण्यास मदत करू शकतात.
टाळू स्वच्छ ठेवा, नियमित केस धुवा, संतुलित आहार घ्या आणि तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.
कोंडा खूप वाढत असेल, टाळू लाल होत असेल, जास्त खाज किंवा केस गळती होत असेल तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.