Sameer Panditrao
मार्चमध्ये गोवा पर्यटनासाठी योग्य आहे का? काहींना हे उत्तम वेळ वाटतो, तर काहींना नाही. जाणून घ्या लोकांची मतं!
काही पर्यटक म्हणतात की मार्चमध्ये गोवा खूप गरम असतो! दुपारच्या वेळी बाहेर फिरणं कठीण जातं, तरी गोवा हा सुंदर अनुभव आहे.
काही पर्यटक म्हणतात की उन्हाळ्यात गोवा परिसरातील जंगल फिरत येते, दिवसा आराम करून संध्याकाळी बीचवर एन्जॉय करता येतो.
डिसेंबर-फेब्रुवारीपेक्षा मार्चमध्ये हॉटेल्स स्वस्त मिळतात. गर्दीही कमी असते, त्यामुळे बजेटमध्ये गोवा एन्जॉय करता येतो असे काहींचे मत आहे.
मार्चमध्ये गोव्यात आगळावेगळा शिगमोत्सव पाहता येतो, पर्यटकांना याबद्दल प्रचंड कुतूहल आहे.
गोव्यातले कार्निव्हल उन्हाळ्याच्या सुरुवातीला असतात, यातील कार्यक्रम, खाद्यसंस्कृतीचा आनंद घ्यायला आवडतो असे काहींनी मत व्यक्त केले.
नाईटलाईफ एन्जॉय करण्यासाठी हा काळ उत्तम आहे असे अनेकांचे मत आहे.