Sameer Panditrao
हिवाळ्यानंतरही बर्फाच्छादित पर्वत आणि स्कीईंगसाठी प्रसिद्ध असलेले गुलमर्ग, मार्चमध्ये थंड वातावरण आणि अप्रतिम निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी उत्तम आहे.
हिमालयाच्या कुशीत वसलेले तवांग हे शांत, सुंदर आणि अप्रतिम दृष्यांनी नटलेले ठिकाण आहे. येथे बौद्ध मठ आणि बर्फाच्छादित शिखरे मन मोहवतात.
चहाच्या मळ्यांनी वेढलेले मुन्नार मार्चमध्ये आल्हाददायक हवामान आणि हिरवाईने नटलेले असते. निसर्गाच्या सान्निध्यात काही निवांत क्षण घालवण्यासाठी हे ठिकाण योग्य आहे.
उंच पर्वत, नितळ नद्या आणि शांतता अनुभवायची असेल तर स्पीती व्हॅलीला नक्की भेट द्या. मार्चमध्ये येथे थोडा बर्फ असतो आणि हवामान थंडसर असते.
राजस्थानातील एकमेव हिल स्टेशन असलेले माउंट आबू मार्चमध्ये आल्हाददायक हवामान आणि निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. नक्कीच भेट द्या!
वसंत ऋतूची सुरुवात काझीरंगाला एक वेगळे सौंदर्य देते. गेंडे, हत्ती आणि पक्ष्यांची विविधता पाहण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.
शांत, स्वच्छ आणि कमी गर्दी असलेले हे ठिकाण मार्चमध्ये अप्रतिम दिसते. येथील निसर्गरम्य वातावरण आणि ब्रिटिशकालीन वास्तू तुमच्या प्रवासाला खास बनवतील.