पाहा निळ्याची नवलाई

Priyanka Deshmukh

सुमारे पाच वर्षांपूर्वी तिने ‘वाईप आऊट वेस्ट’ या नावाच्या स्त्री कारागीर चळवळीने आयोजित केलेल्या ‘कचऱ्यापासून संपत्ती’ या विषयावरच्या प्रदर्शनात भाग घेतला. तिथं तिला जो प्रतिसाद मिळाला तो तिच्यासाठी अनपेक्षित होता आणि तेव्हा तिच्या लक्षात आले की ती आपल्या या छंदाला व्यवसायात बदलवू शकते.

Shop unique handmade denim bags , clothes and accessories in goa | Instagram/ ecocia_goa

हा व्यवसाय फायदा करून देणारा तर होताच पण पर्यावरणस्नेही होता. मुख्य म्हणजे लोकांना आकर्षित करून घेणारा होता. तिने आपल्या ह्या कलेला व्यवसाय म्हणून स्वीकारल्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. जुने-पुराणे जीन्सचे कपडे वापरून, त्यापासून ती जे काही करते ते फार आकर्षक असते.

Shop unique handmade denim bags , clothes and accessories in goa | Instagram/ ecocia_goa

जेसिया कुतिन्हो ही खरं तर एक फार्मासिस्ट. चूष म्हणून तिने तिने टेलरिंगमध्ये एक क्रॅश कोर्स केला. या कोर्सनंतर तिला स्वतःतल्या निर्मिती क्षमतेची आणि प्रतिभेची जाणीव झाली. अर्थात तिला पुढे कपड्यांवर खूप प्रयोग करावे लागले आणि ‘ट्रायल अँड एरर मेथड’ स्वीकारूनच पुढे जावे लागले. तिच्या दृष्टीने डेनिममध्ये इतक्या शक्यता आहेत की त्यातून वापरात येऊ शकतील असे अनेक विविध प्रकार आकाराला येऊ शकतात.

Shop unique handmade denim bags , clothes and accessories in goa | Instagram/ ecocia_goa

डेनिम टिकाऊ आहे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या फॅशन कालातीत आहेत. जुन्या जीन्सना नवे उपयोगी रूप देणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने अशासाठी महत्त्वाचे आहे की त्यामुळे साध्या एका जीन पॅन्टच्या निर्मितीसाठी जी विपुल नैसर्गिक संसाधने कारणी लागलेली असतात त्यांचा व्यय टाळला जाऊ शकतो.

Shop unique handmade denim bags , clothes and accessories in goa | Instagram/ ecocia_goa

जुन्या जीन्सची जी अवस्था असेल त्यानुसार तिच्या कल्पकतेला चालना मिळते. जुन्या कपड्यांवर डाग असतात, छिद्रे असतात, त्या साऱ्यांचा विचार करून तिच्या मनात त्यांच्या नव्या स्वरूपाचा विचार जन्माला येतो. हे एक प्रकारे तिच्या कल्पनाशक्तीला आव्हान असते पण त्यातूनच कलात्मक असे काहीतरी घडते.

Shop unique handmade denim bags , clothes and accessories in goa | Instagram/ ecocia_goa

नव्या निर्मितीचे प्रत्येक डिझाईन तिचे स्वतःचे अाहे. ती एकटीच स्वतः ते पूर्ण करते इतकंच नव्हे तर त्यांच्या निर्मितीनंतर ती स्वतःच त्या निर्मितीबरोबर मॉडेल बनून उभी राहते. आपल्या उत्पादनांची छायाचित्रे ती स्वतःच घेते, नंतर ती छायाचित्रे आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करते. ‘ecocia_goa’ हा तिचा इंस्टाग्राम अकाउंट आहे.

Shop unique handmade denim bags , clothes and accessories in goa | Instagram/ ecocia_goa

या इंस्टाग्रामवरूनच ती आपली उत्पादने विकते. याव्यतिरिक्त इतर वेस्ट मटेरियलचाही उपयोग ती आपल्या निर्मितीत करते. उदाहरणार्थ चामडे, टेट्रापॅक, प्लास्टिक इत्यादी. जे उपयोगी आहे ते काहीही ती वापरू शकते. जेसिया अजून फार्मासिस्ट म्हणून कार्यरत असली तरी ते क्षेत्र कायमचे सोडण्याचा तिचा विचार पक्का झाला आहे. तिला आपल्या या कलात्मक निर्मिती क्षेत्रातच पूर्णपणे राहायचं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shop unique handmade denim bags , clothes and accessories in goa | Instagram/ ecocia_goa