Sameer Panditrao
२९ एप्रिल रोजी प्रसिद्ध अभिनेता इरफान खान याचे दुःखद निधन झाले होते.
दिग्दर्शक शुजित सरकार यांनी सोशल मीडियावर त्याच्या आठवणीत खास पोस्ट लिहिली आहे.
यात त्यांनी नमूद केलं आहे कि प्रिय इरफान तू जिथे आहेस तिथले लोक तुझ्या प्रेमात असतील पण इथे लोकांना तुझी किती आठवण येते हे माहिती आहे का.
पुढे सरकार म्हणतात की तुझे हसू आणि तुझे ते गूढ डोळे माझ्या आठवणीत कोरले आहेत.
पुढे ते नमूद करतात इरफानचा मुलगा बबिल खान यासोबत मी फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटतो.
शेवटी ते म्हणतात की मला माहित आहे की तू जिथे असशील तिथून आमच्यावर लक्ष ठेवत आहेस आणि ही एक दिलासादायक गोष्ट आहे.
इरफानच्या खानचे नावे लिहिलेली ही भावनिक पोस्ट दिग्दर्शक शुजित सरकार यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर नक्की वाचा.