गोमन्तक डिजिटल टीम
अत्यंत पवित्र मानला जाणारा श्रावण महिना सुरु झाला आहे. या निमित्याने गोव्यातल्या एका सुंदर मंदिराची सैर आम्ही तुम्हाला घडवून आणणार आहोत.
नेरुळ येथे असणारे हे टुमदार शिवमंदिर गोव्यातील एक पवित्र स्थान आहे. श्रावणात देवदर्शनासाठी हे मंदिर तुमच्या यादीत असलेच पाहिजे.
श्री शिवलिंगाच्या आकाराप्रमाणे या मंदिराची रचना केलेली आहे. आकर्षक रंगसंगतीमुळे या मंदिराचे रूप आणखीनच उजळते.
हे मंदिर सुंदर परिसरात वसवले आहे. हिरवीगार झाडे आणि नदीचे वाहते पाणी या परिसराला प्रसन्न बनवते.
मंदिराच्या आत गेल्यावर तुम्हाला तुम्हाला फुलांनी नटलेले शिवलिंग दिसेल जे भगवान शंकराच्या शक्तीचे प्रतिक आहे.
या मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्य उत्सव आणि कार्यक्रम आयोजित केले जातात. श्रावण सोमवारी भक्त दर्शनासाठी येतात.
बार्देश तालुक्यात नेरुळ येथे हे मंदिर आहे. पणजीपासून हे मंदिर १२ किमी अंतरावर आहे. तुम्ही खासगी कार अथवा सार्वजनिक सेवा वापरून इथे जाऊ शकता.
जाणून घ्या 'या' पुरातन नागमंदिरांचा अद्भुत इतिहास