Manish Jadhav
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन मतभेद झाल्यानंतर अखेर सांगेत चर्चसमोर पुतळा उभारण्यात आला.
तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (17 मार्च) पालिकेच्या नेहरु पार्कमध्ये विधिवत महाराजांचा पुतळा उभारण्यात आला.
आमदार तथा समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते हा पुतळा उभारण्यात आला.
सांगे नगरपालिकेच्या वतीने शहरातील पालिकेच्या नेहरु पार्कमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा याबाबत ठराव समंत झाला होता.
मात्र, याला काही नगरसेवकांनी विरोध दर्शवला होता. चर्चसमोर शिवरायांचा पुतळा उभारल्याने धार्मिक वाद होईल, त्यामुळे पुतळ्याची जागा बदलली जावी, अशी मागणी केली जात होती. पण, वाद मिटल्याचा दावा करत सांगे पालिकेच्यावतीने सोमवारी शिवरायांच्या पुतळा उभारण्यात आला.
महाराजांचा पुतळा उभारण्याच्या कार्यक्रमाला मंत्री फळदेसाई यांच्यासह नगपालिकेचे नेत्यांसह हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन नागरिकांनी हजेरी लावत सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवले.