Manish Jadhav
गोव्याची निसर्गलता इथे येणाऱ्या पर्यटकांना मोहिनी घालते. गोव्याला एकदा भेट देणारा पर्यटकही इथल्या निसर्गाच्या प्रेमात पडतो.
गोव्यातील शांत, सुंदर समुद्रकिनारे पाहणे पर्यटक पसंत करु लागले आहेत. कळंगुट, बागाशिवाय दक्षिण गोव्यातील हिडन समुद्रकिनारे पाहण्यास पर्यटक पसंती देत आहेत.
गोवा जसा त्याच्या निसर्ग सौंदर्य, समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे तशीच इथली खाद्यसंस्कृतीही समृद्ध आहे. आज (17 मार्च) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून गोव्यातील प्रसिद्ध अशा 3 रेस्टॉरंटविषयी जाणून घेणार आहोत...
गिरीजा गायक नावाच्या काकू इथे मोठ्या प्रेमाने आपल्या सोबतींनीसोबत घरगुती स्वरुपातील आणि गोव्याची अस्सल चव असणारे जेवण तयार करतात.
कोळंबी, बांगडा, सुरमई अशी ताजी मासळी रवा लावून ज्या पद्धतीनं तळली जाते. इथे तुम्हाला थाळीचा ऑप्शन देखील मिळतो.
गोव्यातील काबो दे रामा परिसरातच केप गोवा नावाचे एक रेस्टारंट आहे. इथे मिळणारे Wraps आणि सॅलड्स कमाल चवीचे आहेत.
दक्षिण गोव्यात तुम्हाला काही ऑफबिट खायचे असेल तर द मिल हा तुमच्यासाठी खास ऑप्शन आहे. इथे तुम्हाला अस्सल गोवन पदार्थांची चव चाखायला मिळते.