Sameer Panditrao
तोरणा, पुरंदर, राजगड असे पाच-सहा किल्ले आणि भवतालचा मुलुख घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे करायला सुरुवात केली.
या दरम्यान मुहम्मद आदिलशाह आजारी पडला होता.
याचा फायदा घेऊन महाराजांनी आदिलशाहच्या ताब्यात असलेली कोकणातील बरीच ठाणी ताब्यात घेतली.
या जिंकलेल्या मुलुखावरती त्यांनी औरंगजेबाची मान्यता मिळवली.
असे करून महाराजांनी फार मोठा डाव खेळला.
औरंगजेब या खेळीला ओळखू शकला नाही आणि तो गाफील राहिला.
यानंतर सातच दिवसांनी महाराजांनी औरंगजेबाच्या सत्तेत असलेल्या जुन्नरवर छापा टाकला आणि दाणादाण उडवली.