Sameer Panditrao
पूर्वीच्या काळात प्रत्येक साम्राज्याची त्यांची स्वतःची युद्धतंत्रे होती.
छ. शिवरायांचा गनिमी कावा हे युद्धतंत्र आपल्याला माहिती आहेच.
मुघल सैन्याचे स्वतःचे एक वेगळे युद्धतंत्र होते.
हे युद्धतंत्र सुलतानढवा या नावाने ओळखले जाते.
सुलतानढवा म्हणजे निवड्क सैन्याने प्राणाची पर्वा न करता केलेला जोराचा हल्ला.
या पद्धतीत सैन्याची तुकडी एकत्र जिंकायचे अथवा पूर्ण संपून जायचे ही मानसिक तयारी करून हल्ला चढवायचे.
हे तंत्र मोकळ्या, सपाट मैदानात जास्त वापरले गेले त्यामुळे डोंगरकिल्ल्यांच्या प्रदेशात हे फारसे यशस्वी झाले नाही.