Sameer Panditrao
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आणि प्रजेसाठी केलेल्या महत्वाच्या कार्याची आपल्याला ओळख आहेच.
पण महाराज देशी झाडे लावण्यासाठी आग्रही होते, त्यासाठी ते भरघोस मदत करत हे माहिती आहे का?
शिवाजी महाराज शेती, जमिनी, झाडे याबाबत जागरूक होते.
चिंच, डाळिंबे, आंबा अशा झाडांची लागवड करण्यासाठी ते नागरिकांना सरकारी जमिनी देत.
ही झाडे उपयुक्त असल्याने तिथे सरकारी मदत दिली जात असे.
याबदल्यात लावलेल्या झाडांच्या उत्पन्नाचा एक तृतीयांश भाग सरकारात दिला जावा असा महाराजानी नियम केला होता.
शस्त्रांच्या जोडीला समृद्ध
शेती असावी याबाबत महाराज सदैव प्रयत्नशील होते.