Pramod Yadav
गेरार्डा कुन्हा यांच्या कल्पनेतून 1997 साली साकारलेले तोर्डा येथील हाऊस ऑफ गोवा म्युझियम, इंडो-वेस्टर्न कलाकृतीचा उत्कृष्ठ नमुना आहे.
गोव्याचा इतिहास, मुक्तीसंग्रास, संस्कृती यांची झलक दाखवणारे आग्वाद किल्ल्यातील इंटरएक्टिव्ह म्युझियम एकदा आवश्य पाहावे असेच आहे.
दक्षिण गोव्यातील लोटली येथे असणारे बिग फूट म्युझियम गोव्याचा मागील 100 वर्षाचा प्रवास पुतळ्यातून उलघडून दाखवते.
ओल्ड गोव्यातील पुरातत्व खात्याचे संग्रहालयात गोव्यासह देशभरातील महत्वाच्या पुरातन वस्तू, दस्तऐवज आणि घटनांचा संग्रह पाहायला मिळतो.
मकाऊ, पोर्तुगाल, चीन आणि युरोपातील पुरातन आणि वैविध्यपूर्ण वस्तू तसेच, इटालियन मार्बल, बेलजियन ग्लास याची अनुभूती या संग्रहालयात घेता येईल.
कलेचा उत्कृष्ठ नमुना म्हणून पिळर्ण येथील गोवा संग्रहालय प्रसिद्ध आहे. यात कलात्मक वस्तू, गोव्याचा इतिहास याचे कायमस्वरुपी प्रदर्शन पाहायला मिळते.
ओल्ड गोव्यात आशिया खंडातील ख्रिस्ती कलेचे पहिले संग्रहालय आहे. पोर्तुगीज शैलीचा प्रभाव असलेल्या अनेक उत्तम कलाकृती येथे पाहायला मिळतील.
वार्का येथील सन थोम संग्रहालयात अनेक दुर्मिळ आणि तंत्रज्ञान संबधित वस्तू पाहायला मिळतील. काळानुसार बदलत गेलेल्या वस्तू आणि तंत्रज्ञानाची येथे माहिती घेता येईल.
गोव्याच्या सांस्कृतिक वारसा दाखवणाऱ्या सुमारे 40 हजार कलाकृती दक्षिण गोव्यातील बाणावली येथील चित्र संग्रहालयात पाहता येतील.