Chhatrapati Shivaji Maharaj: महाराजांची नौदल मोहीम! घनघोर लढाईत पोर्तुगीजांना पाजलं होतं पाणी

Manish Jadhav

शिवजयंती

आज 19 फेब्रुवारी… छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती… सगळीकडे शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

मोहीमा

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कारकि‍र्दीत अनेक मोहीमा राबवल्या. त्यापैकी तुम्हाला तंजावरची मोहीम आठवतचं असेल ना... आज आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून महाराजांच्या नौदल मोहिमेविषयी जाणून घेणार आहोत.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

नौदल मोहीम

सिंधुदुर्गाची बांधणी सुरु करुन महाराज एका अनोख्या मोहिमेच्या तयारीस लागले. ही मोहीम होती नौदल मोहीम.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

पोर्तुगीजांना जुमानलं नाही

त्याकाळी समुद्रावर पोर्तुगीज स्वत:ला सम्राट समजत. त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही व्यापार करु शकत नसत. मात्र महाराजांनी पोर्तुगीजांना कधीच जुमानलं नाही.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

पहिले राजे

पोर्तुगिजांच्या उरावरुन म्हणजे गोव्याच्या समुद्रातून आणि सिंधुसागरातून स्वत: युद्धनौका घेऊन आदिलशहाचे बंदर असणार्‍या बसरुरवर स्वारी करणारे शिवाजी महाराज हे पहिले भारतीय राजा होते.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

पराक्रम

फेब्रुवारी 1665 च्या सुरुवातीला स्वत: शिवाजी महाराज 85 गलबते आणि तीन मोठ्या युद्धनौका घेऊन मालवणहून शिडे उभारुन पोर्तुगिजांच्या डोळ्यांदेखत आग्वाद, वास्कोच्या किल्ल्यासमोरुन सिंधुसागरातून गेले होते.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

भीमगडी मुक्काम

त्यानंतर बसरुर बंदरात आदिलशहा आणि पोर्तुगीज यांच्याकडून वसुली घेऊन महाराज पुन्हा परत फिरले होते. इंग्रज आणि अदिलशहाकडून जबरदस्त वसुलीचे नजराणे स्वीकारुन महाराज गोव्यातील सत्तरी तालुक्याच्या सीमेवर भीमगड येथे मुक्कामास आले होते.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak

जहाजे पोर्तुगिजांनी अडवली

गोकर्णहून महाराजांची गोवा मार्गे येणारी जहाजे पोर्तुगीजांनी मुरगाव (वास्को) च्या समुद्रात अडवली. येथे मराठे आणि पोर्तुगीज यांच्यात घनघोर लढाई झाली, त्यात तांदळाने भरलेल्या अकरा बोटी पोर्तुगीजांनी पकडल्या, पण लगेच सोडून देण्याची नामुष्की पोर्तुगीजांवर आली होती.

Chhatrapati Shivaji Maharaj | Dainik Gomantak
आणखी बघा