Manish Jadhav
आज 19 फेब्रुवारी… छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती… सगळीकडे शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
रयतेच्या कल्याणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्यातील गडकिल्ले हे स्वराज्याची ताकद होते.
महाराजांनी काही किल्ले शत्रूकडून जिंकले होते, काहींची डागडूजी केली, तर काही नव्याने बांधले. महाराजांनी गोव्यामध्ये देखील बरेच वर्चस्व निर्माण केले होते.
महाराजांच्या आदेशानुसार गोव्यातील बेतुल किल्ला हा गोव्यामध्ये बांधलेला एकमेव किल्ला होता. बेतुल किल्ला बांधणीत एका गोमंतकीयाने मोठे योगदान दिले होते. चला तर यासंबंधीची कहाणी जाणून घेऊया...
बेतुल येथे साळ नदीच्या किनारी शिवाजी महारांजाच्या आदेशानुसार बाळ्ळीच्या हवालदाराने किल्ला बांधणीची सुरुवात केली होती, मात्र याची भनक पोर्तुगीजांना लागताच तत्कालीन गव्हर्नरचा तिळपापड झाला.
हा किल्ला बांधण्यामागे महाराजांची दूरदृष्टी होती. दुसरीकडे मात्र, जर हा किल्ला बांधून झाला तर आपल्या स्वराज्याला त्याच्यापासून धोका निर्माण होईल अशी धास्ती पोर्तुगीजांना वाटत होती.
पोर्तुगीज-मराठा यांच्यात झालेल्या मैत्रीपूर्ण तहात या किल्ल्याच्या बांधणीमुळे बाधा निर्माण होईल, त्यामुळे बांधकाम तात्काळ थांबवावे असा संदेशा पोर्तुगीज गव्हर्नरने बाळ्ळीच्या हवालदाराला पाठवला होता.
आम्ही शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार किल्ला बांधत आहोत, आम्ही आमच्या राज्यात काहीही करो तुम्ही जाब विचारणारे कोण? असे उत्तर पोर्तुगीजांच्या संदेशाला बाळ्ळीच्या हवालदाराने दिले होते.
त्यानंतर पोर्तुगीजांनी हा किल्ला गुपचूप माणसे पाठवून पाडण्याचा कपटी डाव आखला, कारण त्यांना हा किल्ला बांधला गेला तर आपल्या स्वराज्याला धोका निर्माण होईल असे वाटत होते.
मात्र पोर्तुगीजांचा कपटी डाव हाणून पाडत 1679 मध्ये बाळ्ळीच्या हवालदाराने शिवाजी महाराजांच्या आदेशावरुन किल्ला बांधूनच दाखवला.