Sameer Amunekar
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा बीच त्याच्या नितळ निळ्या पाण्यासाठी आणि मऊ चंदेरी वाळूसाठी ओळखले जाते. इथला निसर्ग पाहून तुम्हाला परदेशातील बीचची आठवण येईल.
इथला समुद्रकिनारा उथळ असल्याने पोहण्यासाठी आणि मनसोक्त आंघोळ करण्यासाठी अतिशय सुरक्षित मानला जातो. पांढऱ्या शुभ्र लाटांसोबत खेळताना वेळ कसा जाईल, हे कळणारही नाही.
इतर प्रसिद्ध किनाऱ्यांच्या तुलनेत शिरोडा बीचवर गर्दी कमी असते. जर तुम्हाला गोंगाटापासून दूर शांततेत समुद्राचा आनंद घ्यायचा असेल, तर हे ठिकाण तुमच्यासाठी 'बेस्ट' आहे.
केवळ आंघोळच नाही, तर शिरोडा आणि जवळच असलेल्या आरोंदा खाडीत तुम्ही पॅरासेलिंग, जेट स्की आणि बनाना राईड सारख्या साहसी खेळांचा आनंद घेऊ शकता.
सूर्यास्ताच्या वेळी आकाशात उमटणारे रंग आणि चंदेरी वाळूवर पडणारे प्रतिबिंब फोटोग्राफीसाठी उत्तम बॅकड्रॉप देतात. इथे तुमचे रिल्स आणि फोटोज जबरदस्त येतील.
समुद्रात डुंबून झाल्यावर जवळच असलेल्या होमस्टेमध्ये ताज्या मासळीचे आणि अस्सल मालवणी जेवणाचा आस्वाद घ्यायला विसरू नका. इथली सोलकढी तुमचा थकवा क्षणात घालवेल.
शिरोडा हे वेंगुर्ल्यापासून जवळ असून गोव्याच्या सीमेला लागून आहे. तुम्ही सावंतवाडी किंवा कुडाळ रेल्वे स्थानकावरून खाजगी वाहनाने इथे सहज पोहोचू शकता.