Sameer Amunekar
तांदूळ धुतलेले पाणी फेकून न देता झाडांना घाला. यामध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे झाडांच्या मुळांची वाढ वेगाने होते आणि रोपे हिरवीगार दिसतात.
वापरलेली चहापत्ती स्वच्छ धुवून वाळवून घ्या आणि खत म्हणून कुंड्यांमध्ये टाका. नायट्रोजनचा हा उत्तम स्रोत असून गुलाबासारख्या फुलांच्या झाडांसाठी हे 'वरदान' ठरते.
कांद्याची साले रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी झाडांना द्या. पोटॅशियमने समृद्ध असलेले हे नैसर्गिक टॉनिक झाडांना कीड लागण्यापासून वाचवते.
केळीच्या सालीचे बारीक तुकडे करून मातीत मिसळा किंवा त्या पाण्यात भिजवून त्याचे लिक्विड खत द्या. यामुळे फुलांची आणि फळांची संख्या वाढण्यास मदत होते.
झाडांवर कीड किंवा पांढरी माशी दिसल्यास एका लिटर पाण्यात थोडे कडुनिंबाचे तेल आणि लिक्विड सोप मिसळून फवारा. यामुळे झाडे रोगमुक्त राहतील.
महिन्यातून किमान दोनदा कुंडीतील माती वर-खाली करा. यामुळे मुळांपर्यंत हवा पोहोचते आणि झाडांची वाढ थांबलेली असल्यास ती पुन्हा सुरू होते.
झाडांना नेहमी सकाळी लवकर किंवा सायंकाळी सूर्यास्तानंतर पाणी द्या. भर उन्हात पाणी दिल्यास बाष्पीभवनामुळे झाडांना पुरेसा ओलावा मिळत नाही आणि ती सुकू शकतात.