Sameer Panditrao
इंग्लंडविरुद्धच्या टी-२० व एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय महिला संघाची निवड करण्यात आली.
भारत-इंग्लंड यांच्यामध्ये पाच टी-२० व तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.
२८ जूनपासून या मालिकेला सुरुवात होईल.
सलामी फलंदाज शेफाली वर्मा हिची भारताच्या महिला टी-२० संघात तब्बल सात महिन्यांनंतर निवड झाली आहे.
शेफाली वर्मा हिला सुमार फलंदाजी फॉर्ममुळे भारतीय संघातून वगळण्यात आले होते.
महिला प्रीमियर लीगच्या यंदाच्या मोसमात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना तिने १५२च्या स्ट्राइक रेटने ३०४ धावा फटकावल्या.
शेफाली हिला भारताच्या टी-२० संघात स्थान देण्यात आले; मात्र इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी तिला भारतीय संघात संधी देण्यात आली नाही.