Akshata Chhatre
प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवालाचे अचानक निधन झाले. रिपोर्टनुसार, तिला कार्डियाक अरेस्ट आला आणि तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.
पण तुम्हाला माहितेय का शेफाली लहानपणापासूनच एका गंभीर आजाराशी झुंज देत होती?
१५ व्या वर्षापासून तिला फिट म्हणजेच मिर्गीचे झटके यायचे. त्या काळात अभ्यासाचा प्रचंड ताण, परीक्षेचं प्रेशर या सगळ्यामुळे तिला स्ट्रेस आणि एंग्जायटीने झपाटलं होतं.
मिर्गी ही एक न्यूरोलॉजिकल स्थिती आहे ज्यामध्ये मेंदूत असामान्य इलेक्ट्रिकल अॅक्टिव्हिटीमुळे वारंवार झटके येतात.
अचानक चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे, स्नायूंमध्ये आकुंचन किंवा हात-पाय हलणे, भीती, चिंता किंवा राग येणे, बोलण्यात अडचण येणे, काही क्षणांसाठी स्मृती हरवणे, चेहरा, मान किंवा शरीरात करंटसारखं जाणवणे.
डोक्यावर गंभीर इजा, ब्रेन ट्यूमर किंवा सिस्ट, ब्रेन स्ट्रोक, अल्झायमर, जन्मापूर्वीच डोक्याला झालेली इजा.