पावसाळ्यात कपडे सुकत नाहीत, कुबट वास येतोय? 'हे उपाय करून बघा

Akshata Chhatre

कपडे सुकवणे

पावसाळ्यात कपडे सुकवणे हे एक मोठे आव्हान असते. सततचा ओलावा, सूर्यप्रकाशाचा अभाव आणि हवामानातील दमटपणा यामुळे कपड्यांमध्ये वास येणे, बॅक्टेरिया तयार होणे, आणि त्वचेला त्रास होणे अशा अनेक अडचणी निर्माण होतात.

घरगुती उपाय

पण काही सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करून तुम्ही हे टाळू शकता.

वॉशिंग मशीन

पावसाळ्यात वापरलेले कपडे शक्य तितक्या लवकर धुणे आणि लगेच पसरवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ओले कपडे जास्त वेळ वॉशिंग मशीनमध्ये ठेवू नका.

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा हा नैसर्गिक वासशोषक आहे. कपडे धुताना डिटर्जंटसोबत अर्धा कप बेकिंग सोडा वापरल्यास ओलसर वास कमी होतो.

हलका वास

हलका वास असल्यास कोरड्या कपड्यांवर बेकिंग सोडा शिंपडून रात्रभर पिशवीत ठेवू शकता.

हवा खेळती जागा

घरात हवा खेळती आणि उजेड असलेली जागा निवडा – जसे की खिडकीजवळ, बाल्कनी किंवा पंख्याच्या खाली. शक्य असल्यास पोर्टेबल ड्रायिंग रॅक वापरा जे पंख्याच्या जवळ ठेवता येतील.

महिनाभर कोथिंबीर खराब होणार नाही; पैसे वाचावा 'हे' फॉलो करा

आणखीन बघा