Ashutosh Masgaunde
हमासच्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलवर अचानक हल्ला केला आणि 1,200 लोकांना ठार मारले.
गाझा शहरातील अल-अहली अल-अरबी बाप्टिस्ट हॉस्पिटलमध्ये झालेल्या स्फोटात 500 निष्पापांचा जीव गेला. हा हल्ला कोणी केला हे अद्याप समोर आले नाही.
गाझाच्या जबलिया निर्वासित छावणीवर इस्रायली हवाई हल्ले झाले. यात हमास कमांडरला ठार केल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यात सुमारे 50 लोक ठार झाले आणि 150 जखमी झाले.
गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात 18 नोव्हेंबरपर्यंत १२ हजारांहून अधिक लोक मारले गेले आहेत. चार लाख लोकसंख्येच्या खान युनिस शहरासह संपूर्ण दक्षिण गाझामधील परिस्थिती यावेळी वाईट आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम संपुष्टात येण्याच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वी, तो आणखी एका दिवसासाठी वाढवण्यात आला आला.
हमासने 30 पॅलेस्टिनींच्या बदल्यात आणखी आठ ओलिसांची सुटका केली, आतापर्यंत 97 ओलिसांची सुटका
इस्रायली सैन्याने दक्षिण गाझामध्ये हल्ले तीव्र केले आहेत. दक्षिण गाझामधील मुख्य शहर खान युनिसच्या पूर्व भागात मंगळवारी इस्रायली रणगाड्यांनी जोरदार गोळीबार केला. यात किमान 45 मरण पावले आहेत.