Sameer Amunekar
शमिता आठवड्यातून केवळ एक ते दोनदाच फेसवॉश वापरते. यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल टिकून राहते आणि त्वचा कोरडी होत नाही.
निरोगी त्वचेसाठी रोज केवळ स्वच्छ पाण्याने चेहरा धुणे पुरेसे असल्याचे शमिता सांगते.
साबणात असलेली रसायने त्वचेचे नैसर्गिक तेल काढून टाकतात, त्यामुळे ती चेहऱ्यावर साबण अजिबात वापरत नाही.
रोज 8–10 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला शमिता देते. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि त्वचा आतून स्वच्छ राहते.
त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी ती नियमितपणे मॉइश्चरायझर वापरते. यामुळे त्वचा मऊ, ताजी आणि ग्लोइंग राहते.
शमिता डे आणि नाईट क्रीम्स वापरते. डे क्रीम त्वचेचे संरक्षण करते, तर नाईट क्रीम त्वचेची दुरुस्ती करण्यात मदत करते.
प्रत्येकाने आपल्या त्वचेच्या प्रकारानुसारच क्रीम्स व स्किन केअर प्रॉडक्ट्स निवडावेत, असा शमिताचा सल्ला आहे.