Raigad Tourism: मुंबई-पुण्याजवळचं 'मिनी मालदीव'! नागावच्या रुपेरी वाळूत आणि सुरूच्या बनात हरवून जाल

Sameer Amunekar

नागाव समुद्रकिनारा

कोकणातील रायगड जिल्ह्यात असलेला नागाव समुद्रकिनारा पुण्यापासून सुमारे १६० किमी तर मुंबईपासून १०४ किमी अंतरावर आहे.

Raigad Tourism | Dainik Gomantak

पोहोचण्याचा सोपा मार्ग

अलिबाग बस स्थानकापासून अलिबाग–रेवदंडा रस्त्यावर हा किनारा असल्याने खासगी वाहन किंवा बसने सहज पोहोचता येते.

Raigad Tourism | Dainik Gomantak

भेट देण्यासाठी उत्तम काळ

हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या या नागाव भेटीसाठी सर्वोत्तम मानल्या जातात. हवामान आल्हाददायक असल्याने पर्यटनाचा आनंद दुप्पट होतो.

Raigad Tourism | Dainik Gomantak

निसर्गसौंदर्याची भुरळ

किनाऱ्यावरील सुरूची झाडे, रूपेरी वाळू आणि समुद्रात उसळणाऱ्या फेसाळणाऱ्या पांढऱ्या लाटा पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात.

Raigad Tourism | Dainik Gomantak

सागरी खेळांचा थरार

नागाव येथे जेट स्की, बनाना राईड, पॅरासेलिंग यांसारख्या सागरी खेळांचा रोमांचक अनुभव घेता येतो.

Raigad Tourism | Dainik Gomantak

शांतता आणि स्वच्छता

इतर गजबजलेल्या समुद्रकिनाऱ्यांच्या तुलनेत नागाव किनारा शांत, स्वच्छ आणि निवांत असल्याने कुटुंबीय व सोलो ट्रिपसाठी बेस्ट आहे.

Raigad Tourism | Dainik Gomantak

निसर्गप्रेमींसाठी खास

सूर्योदय–सूर्यास्ताची मनमोहक दृश्ये, थंड समुद्री वारा आणि मोकळा परिसर यामुळे निसर्गप्रेमी व छायाचित्रकारांसाठी हा किनारा खास आकर्षण ठरतो.

Raigad Tourism | Dainik Gomantak

मऊ, चमकदार आणि सुंदर केसांसाठी आजच ट्राय करा हे उपाय

Hair Care Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा