Akshata Chhatre
डेनिम आणि पॉलिस्टर जॅकेट्स वारा अडवू शकत नाहीत. वारा थेट कापडातून आत शिरतो, म्हणून कपड्यांचे थर असूनही थंडी वाजते.
हे जॅकेट हंस किंवा बदकाच्या मऊ पंखांपासून बनलेले असते. हे अत्यंत हलके, विंडप्रूफ आणि शरीराला नैसर्गिक उब देणारे असते.
पफर जॅकेट घेताना ते वॉटरप्रूफ आणि विंडप्रूफ आहे का हे तपासा. याची बाहेरील थर थंड वाऱ्याला शरीरापर्यंत पोहोचू देत नाही.
नेहमी हुडी (टोपी) असलेले जॅकेट निवडा, ज्यामुळे कान आणि मान वाऱ्यापासून सुरक्षित राहतील. कडाक्याच्या थंडीत हे खूप फायदेशीर ठरते.
हातांच्या मनगटापाशी इलास्टिक असलेले जॅकेट निवडा. यामुळे बाह्यांतून हवा आत शिरत नाही आणि शरीराचे तापमान स्थिर राहते.
जास्त थंडी असेल तर जॅकेटच्या आत फुल स्लीव्हज थर्मल नक्की वापरा. कमी थंडीसाठी तुम्ही शॉर्ट किंवा कट स्लीव्हज थर्मल निवडू शकता.
या टिप्स फॉलो करून तुम्ही थंडीपासून स्वतःचा बचाव करू शकता आणि हिवाळ्यातील सर्दी-जुकामाच्या त्रासापासून लांब राहू शकता.