Sameer Panditrao
मध म्हणजे फक्त गोड पदार्थ नाही, तर तो नैसर्गिक औषध, सौंदर्यवर्धक आणि जंतुनाशक घटकही आहे. चला जाणून घेऊ या त्याचे ७ अनोखे उपयोग.
मधात हायड्रेटिंग घटक असतात. चेहऱ्यावर लावल्यास त्वचा मऊ, तजेलदार आणि ओलसर राहते. कोरड्या त्वचेसाठी हा उत्तम उपाय आहे.
मधात अँटिबॅक्टेरियल गुणधर्म असतात. लहान जखम, भाजल्याच्या जागी हलकं मध लावल्यास बरे होण्याची प्रक्रिया जलद होते.
मध आणि ऑलिव्ह ऑईल एकत्र मिसळून केसांवर लावल्यास केसांना नैसर्गिक चमक, पोषण आणि मऊपणा मिळतो.
फुटलेल्या ओठांवर मध लावल्यास काही तासांतच ओठ मऊ आणि गुळगुळीत होतात. कोणत्याही केमिकलशिवाय नैसर्गिक उपचार.
मधात असलेले जंतुनाशक घटक त्वचेवरील पिंपल्स आणि काळे डाग कमी करण्यात मदत करतात. नियमित वापराने चेहरा उजळतो.
मधाचा वापर फेस पॅकमध्ये किंवा अरोमा थेरपीत केल्याने त्वचेतील विषारी घटक निघून जातात आणि मनाला शांतता मिळते.