Sameer Amunekar
सतत आणि अति प्रमाणात हेडफोन वापरण्याचे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. असेच काही 6 संभाव्य आजार या वेबस्टोरीमध्ये सांगितले आहेत.
हेडफोनने जोरात आवाज ऐकल्यास कानातील श्रवण नसिका हळूहळू खराब होतात, ज्यामुळे ऐकण्याची ताकद कमी होते.
सतत आवाजात राहिल्याने काही लोकांच्या कानात सतत गूंज किंवा शिट्टीसारखा आवाज येतो, जो खूप त्रासदायक ठरू शकतो.
इन-ईअर हेडफोन सतत वापरल्यास कानात घाम, घाण साचते आणि त्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.
टाइट हेडफोन किंवा दीर्घकाळ आवाज ऐकल्याने डोकेदुखी किंवा माइग्रेनचा त्रास होऊ शकतो.
सतत हेडफोन वापरल्याने मेंदू थकतो आणि एकाग्रतेत अडथळा निर्माण होतो.