Manish Jadhav
तुम्हाला कलेची आवड असेल तर गोव्यातील सेरेंडिपिटी कला महोत्सवाला तुम्ही नक्की हजेरी लावली पाहिजे.
15 ते 22 डिसेंबर 2024 या दरम्यान गोव्यात सेरेंडिपिटी कला महोत्सव होत आहे. तुम्ही या कालावधीत गोव्यात असाल तर नक्की हा कला मोहत्सव पाहा. कार्यक्रमांची यादी महोत्सवाच्या संकेतस्थळावर जाहीर झाली आहे.
नृत्य, नाट्य, संगीत, चित्रकला, कथाकथन, इन्स्टॉलेशन्स, विशेष प्रकल्प, पाककला, माती बांधकाम कला, स्टँड अप कॉमेडी, कलाविषयक कार्यशाळा, बोलक्या बाहुल्या, विणकाम, पार्श्वध्वनी निर्मिती, कला प्रदर्शने यंदाच्या सेरेंडिपिटीत पाहायला मिळणार आहेत.
पणजी शहरातील जुने गोवा मेडिकल कॉलेज संकुल इमारत, कला अकादमी, डायरेक्टोरेट ऑफ अकाउंटसचे नियंत्रण कक्ष, बांबोळी येथील नागाळी हिल, करंजाळे समुद्रकिनारा, दोनापावला पार्किंग, काम्पाल आर्ट पार्क, सांता मोनिका जेटी, आझाद मैदान या महत्त्वाच्या ठिकाणी सेरेंडिपिटीचे विविध कार्यक्रम आयोजित होणार आहेत.
या महोत्सवातील कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षकांना नोंदणी करावी लागेल, जी सेरेंडिपीटीच्या संकेतस्थळावर जाऊन मोफत करता येते.
गोमंतकीय नाटकाने 'सेरेंडिपीटी'चा पडदा उघडणार आहे. कौस्तुभ नाईक यांनी प्रियांका पाठक यांच्यासोबत दिग्दर्शित केलेले नाटक महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
यंदाच्या महोत्सवात आयटम, ग्लिच इन द मीथ, डू यू नो धिस सॉंग?, मत्तीहा 22:39, द हाऊस ब्लू, बरीड ट्रेजर्स, रिलीफ कॅम्प, बी-लव्हड, शकुंतलम, मुडिएट्टू (लोककला प्रकार), सा पा रे सा पा सा, गाब्रियल्स ट्रायल ही वेगवेगळ्या भाषांमधील नाटके सादर होणार आहेत.