Akshata Chhatre
दरवर्षीप्रमाणे यंदाही लहान मुलांपासून ते वयस्करांपर्यंत प्रत्येकाला आनंद घेता येईल असे कार्यक्रम सेरेंडिपिटीत आहेत.
आजपासून म्हणजेच १५ डिसेंबर पासून गोव्यात सेरेंडिपिटीची सुरुवात झाली आहे.
नृत्य, नाट्य, संगीत, चित्रकला, कथाकथन, इन्स्टॉलेशन्स, विशेष प्रकल्प, पाककला, माती बांधकाम कला, स्टँड अप कॉमेडी, कलाविषयक कार्यशाळा, बोलक्या बाहुल्या अशा विविध कला-रोमांचांना कलारसिक सामोरे जात आहेत.
गोवा मेडिकल कॉलेज इमारत, कला अकादमी, नागाळी हिल, करंजाळे समुद्रकिनारा, दोनापावला पार्किंग, काम्पाल आर्ट पार्क, सांता मोनिका जेटी, आझाद मैदान या ठिकाणी कार्यक्रम सुरु आहेत.
इथे काही कार्यक्रम विनामूल्य तर काही तिकीट देऊन पाहावे लागतील.
कार्यक्रमांना आकारण्यात येणाऱ्या तिकिटाचा दर २९९ रुपये आहे.
नाट्य आणि नृत्य या विभागातील काही सादरीकरणांसाठी हा तिकीट दर ठेवण्यात आलेला आहे.