Akshata Chhatre
असं म्हणतात रोज बदाम खाल्ल्याने फायदा होतो, बुद्धीला चालना मिळते.
म्हणून तुम्ही सुद्धा रोज रात्री बदाम भिजवून खाता का?
हो असं तुमचं उत्तर असेल तर तुमच्याकडून काही चुका होत आहेत त्या आज दुरुस्त करूयात.
बदाम भिजवताना साली न गेलेल्या बदामाची निवड करा आणि हे बदाम आधी नीट धुवून घ्या.
बदाम भिजवताना सध्या कोमट पाण्याचा वापर करा, जास्ती गरम किंवा जास्ती गार पाणी वापरू नका.
बदाम केवळ ८ ते १२ तासांसाठी भिजवून ठेवा यापेक्षा जास्ती पाण्यात राहिल्याने त्यांमधील गुण निघू जाण्याची शक्यता असते.