Manish Jadhav
संवेदनशील त्वचेची (Sensitive Skin) समस्या असलेल्या व्यक्तींना हवामानातील बदल किंवा चुकीच्या उत्पादनांमुळे लगेच रॅशेस आणि खाज येते.
कोणतेही नवीन क्रीम किंवा लोशन थेट चेहऱ्यावर लावू नका. प्रथम ते कानाच्या मागे किंवा हातावर लावून 24 तास वाट पाहा; काही जळजळ न झाल्यासच वापरा.
तीव्र सुगंध असलेल्या साबण किंवा परफ्युममुळे संवेदनशील त्वचेवर रॅशेस येऊ शकतात. नेहमी 'केमिकल फ्री' आणि 'हायपोअलर्जेनिक' उत्पादनांचा वापर करा.
गरम पाण्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते आणि त्वचा कोरडी पडून खाज सुटते. आंघोळीसाठी नेहमी कोमट पाण्याचा वापर करा.
त्वचेची जळजळ शांत करण्यासाठी रासायनिक उत्पादनांऐवजी नैसर्गिक घटकांचा आधार घ्या. कोरफड, काकडीचा रस किंवा ओट्सचा फेसपॅक संवेदनशील त्वचेसाठी उत्तम असतो.
संवेदनशील त्वचेवर उन्हाचा परिणाम लवकर होतो. बाहेर पडण्यापूर्वी 'झिंक ऑक्साईड' किंवा 'टायटॅनियम डायऑक्साइड' असलेले फिजिकल सनस्क्रीन नक्की लावा.
जर त्वचेवर जळजळ किंवा लालसरपणा जाणवत असेल, तर ताज्या कोरफडीचा गर लावा. यामुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि खाज कमी होते.
सिंथेटिक किंवा लोकरीच्या कपड्यांमुळे त्वचेला घर्षण होऊन रॅशेस येऊ शकतात, त्यामुळे मऊ सुती कपडे वापरा.