Manish Jadhav
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ज्या विमान अपघातात निधन झाले त्याबद्दल आपण माहिती घेऊ.
हे विमान एका एव्हिएशन चार्टर कंपनीचे लिअरजेट 45 (एलजे45) होते.
हे विमान दिल्लीच्या व्हीएसआर एव्हिएशन (व्हीएसआर व्हेंचर्स म्हणूनही ओळखले जाते) नावाच्या एअर चार्टर कंपनीचे होते.
लिअरजेट 45 (एलजे45) हे बॉम्बार्डियर एरोस्पेसच्या लिअरजेट डिव्हिजनने बनवले होते. हे एक मध्यम आकाराचे बिझनेस जेट विमान आहे.
यात चार मुख्य मॉडेल आहेत: मूळ मॉडेल 45, मॉडेल 45एक्सआर, मॉडेल 40 आणि मॉडेल 40 एक्सआर.
लिअरजेट 45 नऊ प्रवाशांना घेऊन जाऊ शकते.
विमानाचा कमाल वेग 533 मैल प्रति तास (858 किमी/तास, 463 नॉट्स) आहे तर सामान्य क्रूझ वेग 510 मैल प्रति तास (804 किमी/तास, 445 नॉट्स) आहे.
त्याची सेवा मर्यादा 51000 फूट (१1545 मीटर) आहे.