Akshata Chhatre
ख्रिसमस म्हटलं की 'जिंगल बेल्स'ची धून कानावर पडतेच. पण या गाण्याचा मूळ इतिहास नाताळशी संबंधित नसून तो खूप वेगळा आहे.
हे गाणं जेम्स लॉर्ड पियरपोंट यांनी लिहिलं होतं. विशेष म्हणजे, ते प्रसिद्ध बँकर जे.पी. मॉर्गन यांचे मामा होते.
हे गाणं पहिल्यांदा 'थँक्सगिव्हिंग' या सणासाठी एका चर्चमध्ये गायलं गेलं होतं, ख्रिसमससाठी नाही.
जर तुम्ही या गाण्याचे बोल बारकाईने ऐकले, तर त्यात ख्रिसमस किंवा येशू ख्रिस्तांचा कोणताही उल्लेख आढळणार नाही.
१९६५ मध्ये 'जेमिनी ६' मधील अंतराळवीरांनी हारमोनिका आणि घंटा वाजवून अंतराळात 'जिंगल बेल्स' गाऊन एक जागतिक विक्रम केला.
१८५७ मध्ये जेव्हा हे गाणं पहिल्यांदा प्रकाशित झालं, तेव्हा त्याचं नाव "वन हॉर्स ओपन स्लेह" असं होतं.