गोमन्तक डिजिटल टीम
जगभरात समुद्रात प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. यात प्लास्टिक प्रदूषणाचा वाटा ८० टक्क्यांहूनही जास्त आहे.
समुद्र प्रदूषणाचे दुष्परिणाम आता गोव्यावरही दिसू लागले आहेत.
दक्षिण गोव्यातील विविध किनाऱ्यावर डॉल्फिन ,मासे, इतर जीव मृत अवस्थेत आढळत आहेत.
सप्टेंबर महिन्यात हे प्रमाण अधिकच वाढलेले असून त्यामुळे हा चिंतेचा विषय बनला आहे.
ही समस्या दूर करण्यासाठी सरकार आणि वन्य विभाग काय कारवाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
तज्ज्ञांच्या मते जलप्रदूषण, मासेमारीच्या जाळ्यात अडकणे किंवा अन्य नैसर्गिक कारणांमुळे हे प्रकार घडत असावे
सागरी जिवांना भेडसावणारे धोके कमी करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याची मागणी केली जात आहे.