Sameer Panditrao
शास्त्रज्ञांनी रक्तातील जिवाणूमधून नवे वृद्धत्व प्रतिबंधक संयुग शोधले आहे.
भविष्यात या संयुगाने तरुण दिसण्यासह त्वचा अधिक नितळ आणि तजेलदार दिसण्यासाठी एक नवा पर्याय खुला झाला असल्याचे म्हटले जात आहे.
‘अमेरिकन केमिकल सोसायटी’ आणि ‘अमेरिकन सोसायटी ऑफ फार्माकोग्नोसी’ यांनी प्रकाशित केलेल्या ‘जर्नल ऑफ नॅचरल प्रॉडक्ट्स’मध्ये याबाबत अभ्यास प्रसिद्ध झाला आहे.
शास्त्रज्ञांनी शोधलेली इंडोल मेटाबोलाइट्स त्वचेतील पेशींवर केलेल्या प्रयोगांमध्ये दाह कमी करणे, ऑक्सिडेटिव्ह तणाव अर्था अकाली वृद्धत्वामुळे होणारा ताण कमी करणे यामध्ये सक्षम ठरली.
आता संशोधकांनी शरीरात नैसर्गिकरीत्या निर्माण होणारी काही वृद्धत्व प्रतिबंधक क्षमता असलेले रेणू ओळखले आहेत.
ही तीन संयुगे रक्तातील जिवाणूपासून तयार झाली आहेत आणि प्रयोगशाळेत विकसित करण्यात आलेल्या मानवी त्वचेच्या पेशींमध्ये पेशींचे नुकसान व दाह कमी करण्यास सक्षम ठरली आहेत.
मेटाबोलाइट्सपैकी एका गटाला इंडोल संयुग म्हटले जाते. हे संयुग विशेष लक्ष वेधून घेत असून, त्यांमध्ये वृद्धत्व प्रतिबंधकतेचे वैशिष्ट्य आढळले आहे.