Sameer Amunekar
एकाच वेळी मोठा अभ्यास करण्याचा प्रयत्न करू नका. 25 ते 30 मिनिटांचे छोटे टार्गेट ठरवा आणि ते पूर्ण झाल्यानंतर काही मिनिटांचा ब्रेक घ्या.
अभ्यास करताना मोबाईल जवळ असेल तर लक्ष विचलित होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे नोटिफिकेशन बंद करून मोबाईल शक्यतो दूर ठेवा.
बेडवर किंवा आरामाच्या ठिकाणी अभ्यास केल्यास झोप आणि आळस येऊ शकतो. टेबल-खुर्चीवर बसून अभ्यास करण्याची सवय लावा.
ज्या विषयाचा अभ्यास करणे अवघड वाटते, तो सुरुवातीला घ्या. त्या वेळी मन अधिक फ्रेश असल्याने विषय समजून घेणे सोपे जाऊ शकते.
फक्त पुस्तक वाचण्यापेक्षा महत्त्वाचे मुद्दे स्वतःच्या शब्दांत लिहा. नोट्स, फ्लॅशकार्ड किंवा छोट्या प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून अभ्यास केल्यास लक्ष केंद्रित राहण्यास मदत होते.
झोप पूर्ण न झाल्यास दिवसभर थकवा आणि आळस जाणवू शकतो. त्यामुळे नियमित झोप घ्या आणि अभ्यासाच्या वेळी पुरेसे पाणी प्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.