Akshata Chhatre
समाजात लग्नासाठी किंवा नात्यात राहण्यासाठी अनेकदा प्रचंड दबाव टाकला जातो.
मात्र, 'सिंगल' असणे ही कोणतीही उणीव नसून ती एक सशक्त जीवनशैली असू शकते.
विज्ञानानुसार, जे लोक सिंगल असतात, त्यांना अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे मिळतात.
सिंगल लोक आपल्या मित्र-परिवाराशी अधिक घट्ट जोडलेले असतात, ज्यामुळे त्यांचे 'सपोर्ट सिस्टम' मजबूत राहते.
अभ्यासातून असेही समोर आले आहे की, विवाहित लोकांच्या तुलनेत सिंगल लोक आपल्या फिटनेसबद्दल अधिक जागरूक असतात आणि त्यांचा 'BMI' देखील संतुलित असतो
त्यांना कोणत्याही निर्णयासाठी कोणावर अवलंबून राहावे लागत नाही, ज्यामुळे त्यांची सर्जनशीलता आणि स्वावलंबन वाढते.
आर्थिकदृष्ट्याही सिंगल लोकांचे स्वतःच्या पैशांवर अधिक नियंत्रण असते. त्यामुळे जोडीदार नसणे म्हणजे दु:खी असणे असे नसून, स्वतःच्या प्रगतीसाठी मिळालेली ती एक सुवर्णसंधी आहे.