Sameer Amunekar
शुद्ध पाण्याला रंग नसतो असं वाटतं, पण मोठ्या प्रमाणात (उदा. समुद्रात) पाहिलं तर त्यात हलका निळा रंग दिसतो.
सूर्यप्रकाशात सात रंग असतात. पाण्यात प्रवेश केल्यावर लाल, केशरी आणि पिवळे किरण शोषले जातात; निळे आणि हिरवे परावर्तित होतात, त्यामुळे पाणी निळं दिसतं.
समुद्र जितका खोल, तितका निळा रंग अधिक गडद दिसतो, कारण अधिक प्रकाश आतपर्यंत पोहोचत नाही.
समुद्राच्या पृष्ठभागावर आकाशाचं प्रतिबिंब पडतं, त्यामुळे आकाश निळं असेल तर समुद्रही निळा दिसतो.
काही ठिकाणी शैवाल, खनिजे आणि सेंद्रिय कण प्रकाश वेगळ्या प्रकारे परावर्तित करतात, त्यामुळे पाण्याचा रंग बदलतो.
स्वच्छ पाणी अधिक निळं दिसतं, तर गाळ, चिखल किंवा प्रदूषणामुळे रंग तपकिरी किंवा हिरवट होऊ शकतो.
सकाळी आणि संध्याकाळी प्रकाशाचा कोन वेगळा असल्याने पाणी कधी सोनेरी, कधी हिरवट, तर दुपारी अधिक निळं दिसतं.