Sameer Amunekar
दूधात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D भरपूर असते, जे मुलांच्या हाडांच्या वाढीसाठी आणि दातांच्या मजबुतीसाठी अत्यंत आवश्यक आहे.
दहीमध्ये प्रोबायोटिक्स असतात जे पचनसंस्थेतील जंतू संतुलित ठेवतात. ज्यांना दूध पचत नाही, त्या मुलांसाठी दही हा उत्तम पर्याय ठरतो.
दूध आणि दही दोन्हीमध्ये प्रथिने असतात, पण दहीतील प्रथिने शरीराला लवकर पचतात आणि स्नायू मजबूत ठेवतात.
दह्यातील जिवंत बॅक्टेरिया मुलांच्या इम्युन सिस्टीमला मजबूत करतात, त्यामुळे सर्दी-खोकला, पोटाचे विकार कमी होतात.
सकाळच्या वेळी दूध देणे अधिक फायदेशीर ठरते, कारण त्यातील लॅक्टोज ऊर्जेचा उत्तम स्रोत असतो आणि दिवसभर मुलं सक्रिय राहतात.
उन्हाळ्यात दही थंडावा देतं आणि शरीरातील उष्णता कमी करतं. तर थंडीत दूध उबदार ऊर्जा पुरवते.
दोन्हींचे स्वतःचे फायदे आहेत. त्यामुळे मुलांना सकाळी दूध आणि दुपारी किंवा रात्री जेवणानंतर दही दिल्यास सर्वांगीण पोषण मिळते.