Manish Jadhav
संभाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धा नव्हते, तर एक दूरदृष्टीचे आणि कुशल प्रशासकही होते.
आज (16 जुलै) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून महाराजांच्या प्रशासकीय कौशल्याचे आणि दूरदृष्टीचे पैलूंबद्दल जाणून घेणार आहोत...
संभाजी महाराजांनी न्यायव्यवस्थेला अत्यंत महत्त्व दिले होते. त्यांनी न्यायनिवाडा जलद आणि निष्पक्ष व्हावा यासाठी कठोर नियम बनवले होते.
शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजांनीही शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले. दुष्काळ किंवा इतर नैसर्गिक आपत्त्यांमध्ये शेतकऱ्यांना मदत केली.
त्यांनी आपल्या सैन्यात कठोर शिस्त आणली. सैनिकांना नियमित वेतन दिले आणि त्यांच्या गरजांकडे लक्ष दिले. याशिवाय, सैन्यात भ्रष्टाचार आणि गैरवर्तन करणाऱ्यांना कठोर शिक्षा केली.
संभाजी महाराजांनी शत्रूंनाही योग्य वागणूक दिली. युद्धात पकडलेल्या कैद्यांना अमानुषपणे वागवले नाही.
शिवाजी महाराजांनी उभारलेल्या किल्ल्यांचे महत्त्व ओळखून संभाजी महाराजांनी त्यांची दुरुस्ती आणि बळकटीकरण केले.
महाराजांनी युद्धकाळातही राज्याच्या आर्थिक स्थितीचे योग्य व्यवस्थापन केले. अनावश्यक खर्च टाळले.
ते स्वतः एक विद्वान होते आणि त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली. 'बुधभूषण' हा त्यांचा संस्कृत ग्रंथ त्यांच्या प्रशासकीय आणि राजकीय विचारांचे प्रतिबिंब आहे.