Sameer Amunekar
हा भारतातील सर्वात रोमांचकारी आणि सुंदर रोड ट्रिप मार्ग मानला जातो. उंच बर्फाच्छादित डोंगर, खोल दर्या, निळसर आकाश आणि थंड वारे यामुळे हा प्रवास एखाद्या स्वप्नासारखा वाटतो.
या मार्गावरुन जाताना समुद्रकिनारे, नारळाच्या बागा, छोटे घाट आणि कोकणची सौंदर्यस्थळं डोळ्यांचे पारणे फेडतात. NH-66 मार्गावरील प्रवास अधिक रोमँटिक आणि फोटोजेनिक ठरतो. शिवाय, वाटेत मिळणाऱ्या स्थानिक खाद्यसंस्कृतीचा आस्वादही वेगळाच असतो.
पूर्व भारतातील ही रोड ट्रिप तुम्हाला बर्फाच्छादित पर्वतरांगांमधून घेऊन जाते. गंगटोकमधून नथुला पासकडे जाणारा रस्ता वळणावळणाचा असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेला बर्फ आणि हिरवळ मन मोहून टाकते. इथे वातावरण आल्हाददायक असून ताजेतवाने करणारं आहे.
केरळची ‘ग्रीन रूट’ म्हणून ओळखला जाणारा हा मार्ग चहा बागा, मसाल्याचे बागायती आणि धुक्याने झाकलेले डोंगर यामुळे अप्रतिम वाटतो. मुन्नारमधील शांती, थंड हवामान आणि पक्ष्यांचे आवाज हा प्रवास एक अध्यात्मिक अनुभूती देतो.
स्पीती ही भारतातील सर्वात दुर्गम आणि शांत जागांपैकी एक आहे. हा रस्ता साहसिक प्रवाशांसाठी आदर्श आहे. वाटेत निसर्गाच्या भव्य रूपाचं दर्शन होतं – खडकाळ पर्वत, नद्यांचे काठ आणि छोटे बौद्ध मठ मन शांत करतात.
जर तुम्हाला कमी अंतरात आणि थोड्याच वेळेत निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल, तर पुणे-महाबळेश्वर रोड सर्वोत्तम आहे. पावसाळ्यात हा रस्ता धुक्याच्या चादरीत हरवतो. वाटेत दिसणाऱ्या धबधब्यांनी आणि हिरव्या पर्वतरांगांनी हा प्रवास अजूनच सुंदर होतो.