Manish Jadhav
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI ने आता प्रत्येक घराला लखपती बनवण्याची योजना आणली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने 'हर घर लखपती' नावाची योजना आणली आहे. त्याचवेळी, SBI ने SBI Patrons नावाची ज्येष्ठ नागरिकांसाठीही एक नवीन योजना आणली आहे.
SBI च्या प्रेस रिलीझनुसार, 'हर घर लखपती' ही प्री कॅलकुलेटिड केलेली आवर्ती ठेव योजना आहे, जी ग्राहकांना 1 लाख रुपये ठेवी किंवा त्याच्या पटीत मदत करण्यासाठी डिझाइन केली गेली आहे.
अल्पवयीन मुले देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात, जेणेकरुन त्यांना सुरुवातीपासून बचत करण्याची सवय लावता येईल.
SBI ने निवडक ज्येष्ठ नागरिकांसाठी 'SBI Patrons' योजना सुरु केली आहे. ही एक विशेष EFD योजना आहे, जी 80 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी डिझाइन केलेली आहे.
एसबीआयने आपल्या ग्राहकांना हाय एफडी दर ऑफर करुन इतर ठेव योजना सुरु केल्या आहेत. उदाहरणार्थ, एसबीआय व्ही-केअर ठेव योजना ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्ष ते 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 7.50 टक्के व्याज दर देते.
SBI अमृत कलश, 400 दिवसांची FD योजना ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याजदर देते. ही योजना 31 मार्च 2025 पर्यंत उपलब्ध आहे.