7th Pay Commission: नव्या वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांची होणार चांदी; लवकरच मिळणार मोठं गिफ्ट!

Manish Jadhav

केंद्र सरकार

नववर्षानिमित्त केंद्र सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी बातमी देण्याची तयारी करत आहे.

pm modi | Dainik Gomantak

आतुरता

कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढवण्याचा सरकार विचार करत आहे, ज्याची सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक आतुरतेने वाट पाहत आहेत.

7th Pay Commission | Dainik Gomantak

महागाई भत्ता

आता सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता किती असेल ते जाणून घेऊया. सोबतच, DA ची गणना कशी केली जाते आणि ते कधी जाहीर करणे शक्य आहे हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे.

7th Pay Commission | Dainik Gomantak

3 टक्के DA

ऑक्टोबर 2024 पर्यंत जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2025 मध्ये DA 3 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे, कारण या वेळेपर्यंत ते AICPI 144.5 वर आधारित असेल. जानेवारी 2025 मध्ये डीए (महागाई भत्ता) 53 टक्क्यांवरुन 56 टक्क्यांपर्यंत वाढेल.

7th Pay Commission | Dainik Gomantak

कर्मचाऱ्यांची चांदी

महागाई भत्त्यात ही 3 टक्के वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात लक्षणीय वाढ करु शकते.

7th Pay Commission | Dainik Gomantak

AICPI इंडेक्स

7 व्या वेतन आयोगाअंतर्गत, AICPI (ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स) च्या आधारे महागाई भत्ता मोजला जातो. यावेळी, जुलै ते डिसेंबर 2024 मधील AICPI इंडेक्स डेटा हे ठरवेल की, सरकार DA किती वाढवते.

7th Pay Commission | Dainik Gomantak

घोषणा

जानेवारी 2025 ची DA सुधारणा जुलै ते डिसेंबर 2024 मधील कंज्यूमर प्राइड इंडेक्सच्या डेटावर आधारित असेल. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) वाढ करण्याची औपचारिक घोषणा मार्चमध्ये केली जाते.

7th Pay Commission | Dainik Gomantak
आणखी बघा