Sameer Amunekar
सावंतवाडी तालुक्यातील नरेंद्र डोंगर हे पर्यटनप्रेमी आणि स्थानिकांसाठी एक खास आकर्षण ठरले आहे.
हिरव्या गर्द झाडांनी वेढलेला हा डोंगर नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे.
शांत वातावरण, थंडावा देणारा वारा आणि देखणी दृश्ये यामुळे हे ठिकाण जाडप्यांसाठी परफेक्ट डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाते.
येथील प्रमुख आकर्षण म्हणजे हनुमान मंदिर. या मंदिराच्या आवारात वर्षभर स्वच्छ झऱ्याचे पाणी वाहते.
धार्मिक वातावरणासोबतच येथे एक सुंदर गार्डन देखील आहे, जे विशेषतः जोडप्यांचे आवडते ठिकाण आहे.
गार्डनमध्ये रंगीबेरंगी फुले, व्यवस्थित सजवलेले गवताचे मैदान आणि बसण्याची सोय यामुळे पर्यटक दीर्घकाळ येथे वेळ घालवतात.
निसर्गाचा मनमुराद आनंद घ्यायचा असेल, शांत वातावरणात वेळ घालवायचा असेल किंवा प्रियजनांसह छायाचित्रे टिपायची असतील, तर हे ठिकाण उत्तम पर्याय ठरते.