Akshata Chhatre
लग्नाच्या तयारीदरम्यान त्वचेला बाह्य उपचारांसोबत आतून पोषण देणे महत्त्वाचे आहे.
तुम्ही जे खाता, त्याचा थेट परिणाम त्वचेवर दिसतो. मुरुमे आणि इतर त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी हा डिटॉक्स ड्रिंक प्रभावी आहे.
यासाठी २५० ग्रॅम ताजे आवळे, ७५ ग्रॅम ताजी हळद आणि २० ग्रॅम काळी मिरी एकत्र करून पेस्ट बनवावी लागते.
या पेस्टचा रस काढून तो आयस ट्रेमध्ये गोठवावा.
रोज सकाळी, या रसाचा एक क्यूब एका कप गरम पाण्यात विरघळवून २१ दिवसांपर्यंत उपाशी पोटी प्यायल्यास त्वचेत सुधारणा होते.
आवळा आणि हळदीतील अँटीऑक्सिडंट्समुळे शरीराची आतून स्वच्छता होते
नैसर्गिक निखार येतो, ज्यामुळे लग्नाच्या दिवसासाठी तुमची त्वचा आतून तयार होते.