Sameer Amunekar
पावसाळा म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याला उजाळा देणारा ऋतू. हिरवाई, धबधबे, कुजबुजणारे झरे, धुक्याची चादर आणि गारवा हे सगळं अनुभवण्यासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो.
चेरापुंजी आणि मावसिनराम हे सर्वाधिक पावसाचे ठिकाणं आहेत. येथे सतत कोसळणारा पाऊस, हिरवीगार डोंगररांगा, जिवंत मुळांपासून बनवलेले पूल आणि नोहकलिकाई फॉल्ससारखे धबधबे पर्यटकांना वेड लावतात.
दक्षिण भारतातलं हिरवंगार स्वर्ग म्हणजे मुनार. येथे पावसात चहाचे मळे आणि मिस्टने भरलेले डोंगर दृश्य नजरेत साठवणारे असतात. अट्टुकल आणि लक्ष्मी धबधब्यांमधून पावसाळी सौंदर्य ओसंडून वाहतं.
पावसाळ्यात मुंबईपासून जवळचं, पण खूपच शांत आणि निसर्गरम्य ठिकाण म्हणजे भंडारदरा. रंधा धबधबा, भंडारदरा धरण, आणि सह्याद्री पर्वतरांगांतील हिरवळ यामुळे हे ठिकाण नक्कीच खास आहे.
धर्मशाळा हे ठिकाण पावसात धुक्याने व्यापलेलं असतं. येथे मॅकलोडगंज, भागसू फॉल्स, आणि त्रियुंड ट्रेक अशा सुंदर ठिकाणांना भेट देता येते. पावसात डोंगरात फिरण्याची मजा काही औरच!
‘दक्षिण भारतातील चेरापुंजी’ म्हणून ओळखलं जाणारं अगुंबे हे पश्चिम घाटात वसलेलं एक गूढ आणि मोहक ठिकाण आहे. येथे भरपूर पाऊस पडतो आणि निसर्ग जणू काही चित्रासारखा भासतो.Monsoon Travel Destinations
सिक्कीममधील ही दोन्ही ठिकाणं पावसाळ्यात अत्यंत सुंदर दिसतात. धबधबे, हिमालयाचं दर्शन, आणि थंड हवामान यामुळे हे पर्यटकांचं आवडतं ठिकाण बनतं. निसर्गाच्या कुशीत काही दिवस घालवायचे असतील, तर यापेक्षा उत्तम काहीच नाही!