Yoga for Seniors : वय वाढलं तरी थांबू नका, दररोज करा 'ही' 6 हलकी योगासनं

Sameer Amunekar

ताडासन

ताडासन हे आसन करताना दोन्ही पाय जमिनीवर घट्ट टेकवून सरळ उभं राहावं. दोन्ही हात वर नेऊन बोटं एकत्र करावीत आणि शरीर वर खेचल्यासारखं करावं. हे करताना खोल श्वास घ्यावा. ताडासनामुळे मणक्याला लवचिकता येते आणि रक्ताभिसरण सुधारते.

Yoga For Seniors | Dainik Gomantak

वृक्षासन

एका पायावर उभं राहून दुसरा पाय गुडघ्यावर टेकवायचा. दोन्ही हात नमस्कार मुद्रेत डोक्यावर उचला आणि संतुलन राखत काही क्षण तसा राहा. हे आसन पायांना बळकटी देतं, मानसिक स्थिरता वाढवतं.

Yoga For Seniors | Dainik Gomantak

वज्रासन

गुडघ्यावर बसून पाय मागे वाकवून दोन्ही पंजे मांडीवर ठेवावेत. पाठ ताठ ठेवून काही वेळ शांतपणे बसावं. वज्रासन पचनक्रिया सुधारतं, गुडघ्यांना बळ देतं आणि ध्यानासाठी उपयुक्त ठरतं.

Yoga For Seniors | Dainik Gomantak

मरजारीआसन

हात आणि गुडघ्यांवर चौपायावर बसा. श्वास घेताना पाठ खाली वाकवून मान वर घ्या आणि श्वास सोडताना पाठ वर करत मान खाली घ्या. यामुळे मणक्याची लवचिकता वाढते आणि पाठदुखी कमी होते.

Yoga For Seniors | Dainik Gomantak

सेतूबंधासन

पाठीवर झोपून गुडघे वाकवा, पाय जमिनीवर आणि हात शरीराजवळ ठेवावेत. श्वास घेताना कमरेचा भाग वर उचलावा. या आसनामुळे कंबर, पाठ आणि छाती बळकट होते आणि थकवा कमी होतो.

Yoga For Seniors | Dainik Gomantak

शवासन

हे अत्यंत सोपं पण प्रभावी आसन आहे. सरळ झोपून हात-पाय सैल सोडावेत, डोळे मिटून संपूर्ण शरीर शिथिल करावं. मंद श्वास घेऊन मन शांत ठेवावं. शवासन तणावमुक्ती, रक्तदाब नियंत्रण आणि शांत झोप यासाठी उपयुक्त ठरतं.

Yoga For Seniors | Dainik Gomantak

पावसाळ्या पालेभाजीची शेती करण्यासाठी 'या' टिप्स वाचा

Vegetable Farming | Dainik Gomantak
येथे क्लिक करा