गोमन्तक डिजिटल टीम
गोव्यात विविध ठिकाणी सार्वजनिक गणपतीची पूजा केली जाते.
म्हापसा : खोर्ली येथील सार्वजनिक गणेशमूर्ती.
विविध पोलीस चौक्या, बस स्टॅन्ड आणि मंडळांद्वारे सार्वजनिक गणेशउत्सव साजरा केला जातो.
कुंकळ्ळी : कुंकळ्ळी सार्वजनिक गणेश मंडळाचा गणपती
समाजामध्ये एकता निर्माण व्हावी म्हणून अशा गणेशउत्सवांचे आयोजन केले जाते.
पणजी : विठ्ठल-रखुमाई मंदिर, मळा-पणजी येथील श्रीगणेश.
लहान मुलांमध्ये गणपतीच्या बाजूला असलेला देखाव्याचे जास्ती आकर्षण असते.
धारगळ : धारगळ ग्रामपंचायत सभागृहात पुजण्यात आलेला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती.
घुमट आरतीच्या तालात स्थानिक लोकं या मंडळांसोबत मनोभावे गणपतीची उपासना करतात.
बाळ्ळी : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती.
सार्वजनिक गणेशउत्सव मंडळांकडून विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन केले जाते.
मळा-पणजी : श्री मारुतीगड, मळा-पणजी येथील गणेशमूर्ती.
या सार्वजनिक गणेशउत्सव मंडळांकडून गुणवंत विधार्थ्यांचा गौरव केला जातो.
म्हापसा : श्री गुरुदेव नरसिंह सरस्वती दत्तात्रय मठ, काणका-म्हापसा येथील श्रीगणेश.
अनेकवेळा स्थानिक लोकांकडून पाळीपाळीने गणपतीचा नैवेद्य बनवला जातो.
कुंकळ्ळी पोलिस स्थानकातील गणपती.
सर्वांनी एकत्र येऊन काही दिवस उपासना करावी, खेळीमेळीने उत्सव साजरा करावा, विचारांची देवाणघेवाण व्हावी म्हणून सार्वजनिक गणेशउत्सवला आज देखील अपार महत्व आहे.
एम.ई.एस. गणेश सार्वजनिक समिती, वरुणापुरी-वास्को.