Pranali Kodre
भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 15 फेब्रुवारीपासून सुरू झाला.
या सामन्यातून भारताकडून सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांचे कसोटी पदार्पण झाले आहे.
दरम्यान, यावेळी सर्फराजचे वडील नौशाद खान आणि त्याची पत्नी रामना झहुर स्टेडियममध्ये उपस्थित होते.
ज्यावेळी सर्फराजला कसोटी पदार्पणाची कॅप मिळाली, तेव्हा वडिलांच्या आणि पत्नीच्या डोळ्यात पाणीही उभे राहिले होते.
दरम्यान, यावेळी त्याच्या वडिलांनी घातलेल्या जॅकेटवर मागे लिहिलेल्या मेसेजने सर्वांचे लक्ष वेधले.
नौशाद खान यांनी घातलेल्या जॅकेटच्या पाठीवर 'क्रिकेट हा फक्त जंटलमनचाच नाही, तर सर्वांचा खेळ आहे' अशा अर्थाचा मेसेज लिहिला होता. त्यांच्या जॅकेटवरील मेसेजची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.
दरम्यान, गेल्या अनेकवर्षांत देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर अखेर सर्फराजची प्रतिक्षा संपली असून त्याचे भारताच्या कसोटी संघात पदार्पण झाले आहे.