खेळाचं मैदान अन् व्हॅलेंटाईन; भारतीय खेळाडूंची प्यारवाली लव्हस्टोरी!

Pranali Kodre

प्रेमाचा दिवस...

14 फेब्रुवारी रोजी प्रेमाचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. याच दिवसानिमित्त क्रीडा क्षेत्रातीलच जोडीदार निवडलेल्या जोडप्यांबद्दल जाणून घेऊ.

Valentine's Day Special | Dainik Gomantak

सायना नेहवाल आणि परुपल्ली कश्यप

सायना नेहवाल आणि परुपल्ली कश्यप हे दोघेही बॅडमिंटन खेळत असल्याने अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात.

Saina Nehwal and Parupalli Kashyap | Instagram

दिनेश कार्तिक आणि दिपीका पल्लिकल

भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक आणि स्क्वॅशपटू दिपीका पल्लिकल यांनी 2015 मध्ये लग्न केले. त्यांना दोन जुळी मुलंही आहेत.

Dinesh Karthik and Dipika Pallikal | Instagram

अतानू दास आणि दिपीका कुमारी

अतानू दास आणि दिपीका कुमारी या जोडप्याने तिरंदाजीत भारताला मोठे यश मिळवून दिले आहे. त्यांनी 2020 मध्ये लग्न केले आहे.

Atanu Das and Deepika Kumari | Instagram

बजरंग पुनिया आणि संगिता फोगट

बजरंग पुनिया आणि संगिता फोगट ही देखील चर्चेत राहणारी जोडी असून दोघेही कुस्ती खेळतात. या दोघांनी 2020 मध्ये लग्नगाठ बांधली.

Bajrang Punia and Sangeeta Phogat | Instagram

ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार

ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार यांनी २०२३ मध्ये लग्न केले. हे दोघेही क्रिकेटपटू आहेत.

साक्षी मलिक आणि सत्यवर्त कादियान

साक्षी मलिक आणि सत्यवर्त कादियान हे एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले आणि त्यानंतर त्यांनी 2017 मध्ये लग्न केले. हे दोघेही कुस्तीपटू आहेत.

Sakshi Malik and Satyawart Kadian | Instagram

इशांत शर्मा - प्रतिमा

भारतीय क्रिकेटपटू इशांत शर्माची पत्नी प्रतिमा ही बास्केटबॉलपटू आहे. त्यांनी 2016 मध्ये लग्न केले.

Ishant Sharma - Pratima | Instagram

Valentine's Day: भारतीय क्रिकेटपटूंचे पत्नीबरोबरचे प्लायवाले क्यूट मोमेंट

Cricket Couples | Valentine's Day | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी