Manish Jadhav
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न येथे खेळवला जाणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेनमध्ये खेळवण्यात आलेला तिसरा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला.
टीम इंडियाचे लक्ष मेलबर्नमध्ये पुनरागमनाकडे असेल. या सामन्यात सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा टीम इंडियाचा स्टार खेळाडू जसप्रीत बुमराहकडे लागल्या आहेत.
बुमराहला मेलबर्न कसोटी सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी आहे.
मेलबर्न कसोटी सामन्यात एक विकेट घेतल्याने कसोटी क्रिकेटमध्ये या मैदानावर बुमराहच्या नावावर एकूण 16 विकेट्स होतील. यासह तो एमएसजीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय खेळाडू बनेल.
एमएसजी मैदानावर बुमराहने आतार्यंत 15 विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत अनिल कुंबळेचेही नाव आहे. या मैदानावर त्याने 6 डावात 15 विकेट घेतल्या आहेत. अशा स्थितीत अनिल कुंबळेला मागे टाकण्याची संधी त्याच्याकडे असेल.